नवी दिल्ली : भारतीय संघाचा नवा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) याने आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाच्या पराभवावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. या तिन्ही आयसीसी (icc) टूर्नामेंटमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना का करावा लागला हे रोहित शर्माने सांगितले आहे.
गेल्या तीन आयसीसी स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याच वेळी, 2019 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत, संघ उपांत्य फेरीत पराभूत झाला आणि 2021 टी -20 विश्वचषक स्पर्धेत भारताला पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे या तिन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार होता.
यावर बोलताना रोहित शर्माने सांगितले की, भारतीय संघाच्या या तीनही पराभवांमध्ये एक गोष्ट समान होती. चॅम्पियन्स ट्रॉफी, २०१९ विश्वचषक आणि या विश्वचषकातही आम्ही सुरुवातीच्या टप्प्यात सामने गमावले. आम्ही सुरुवातीला लवकर विकेट गमावल्या आणि त्यामुळेच आम्ही हरलो. ही गोष्ट मी नंतर लक्षात ठेवेन.
आपल्याला सर्वात वाईट परिस्थितीसाठी तयार राहावे लागेल. 10 धावांवर तीन विकेट पडतील अशा परिस्थितीसाठी आम्हाला तयार राहावे लागेल. अशा प्रकारे मला संघाला पुढे घेवून जायचे आहे. जर तुम्ही 10 धावांत 3 विकेट गमावल्या तर तुम्ही 180 किंवा 190 करू शकत नाही असे कुठेही लिहिलेले नाही. या तिन्ही आयसीसी टूर्नामेंटमध्ये एकच गोष्ट कॉमन होती की आम्ही अगदी सुरुवातीलाच विकेट गमावल्या.’
महत्वाच्या बातम्या
- तुमचे खासदार सुद्धा आमच्या जीवावरच निवडून आलेत; शंभुराज देसाईंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- जंगलपहाडातला योद्धा शेवटी जंगलातच कोसळला- संजय राऊत
- मानवी हक्कांचा आदर करणे आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे- नवाब मलिक
- ‘विराटला टी-२० कर्णधारपद न सोडण्याची केली होती विनंती, पण…; सौरव गांगुलीचा खुलासा
- ‘अर्थ स्पष्ट आहे यांना ओबीसींना आरक्षण द्यायचं नाही, केंद्राच्या नावाने हात पाय…’


