Share

टीम इंडिया कारणं शोधत आहे; ऑस्ट्रेलिया कॅप्टनची टीका

Published On: 

सिडनी : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी टेस्ट ब्रिस्बेनमध्ये होणार आहे. टीम इंडिया ब्रिस्बेनमध्ये जाणार आहे की नाही? याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. या टेस्टमुळे भारत विरुद्ध इंग्लंड ही टेस्ट सीरिज अडचणीत येऊ शकते, अशाही बातम्या आहेत. टीम इंडियाचा या विषयावर अधिकृत निर्णय अजून जाहीर झालेला नाही. त्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटींगनं भारतीय टीमवर टीका केली आहे.

रिकी पाँटींग सध्या चॅनल 7 वर कॉमेंट्री करत असताना. त्यावेळी त्यानं टीम इंडियावर टीका केली. “ब्रिस्बेनमध्ये न जाण्यासाठी टीम इंडिया कारणं शोधत आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय टीमला ब्रिस्बेनमधील क्वारंटाईन विषयीच्या नियमांची चिंता होती. आता त्यांना कोरोनाची भीती सतावत आहे. बायो बबलच्या गोष्टी माझ्यासाठी अजब आहेत. कारण ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतीय खेळाडूंपेक्षा जास्त काळ बायो बबलमध्ये राहिले आहेत. ऑस्ट्रेलियन खेळाडूही भारताप्रमाणे हॉटेलमध्ये बंद असतील. आम्ही आयपीएल स्पर्धेच्या वेळी कोणत्याही भारतीय खेळाडूकडून याबबतच्या तक्रारी ऐकल्या नाहीत.” अशी टीका पाँटिंगनं केली आहे.

रिकी पाँटींग इतकी टीका करुन थांबला नाही. त्यानं टीम इंडियाला नियमांची आठवण करुन दिली. ‘भारतीय खेळाडू हे त्यांच्या घरापासून दूर आहेत, हे खरं आहे. त्यांना ही गोष्ट पहिल्यापासूनच माहिती होती. या गोष्टी कुणासाठीही चांगल्या नाहीत. पण, ते ब्रिस्बेनला गेले तर त्यांना हॉटेलमध्ये बंद राहावंच लागेल.”

दरम्यान, चौथा कसोटी सामना हा ब्रिस्बेन येथे १५ जानेवारीपासून खेळवण्यात येणार आहे. पण भारतीय टीमला चौथ्या टेस्टसाठी ब्रिस्बेनला जायचं नाही, अशी बातमी समोर आली होती. यामागचं प्रमुख कारण टीमला पुन्हा क्वारंटाईन व्हायचं नाही, कारण सिडनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!