Share

टीम इंडिया फायनलमध्ये ; वर्ल्ड चँपियनशिपवर संकट

Published On: 

🕒 1 min read

अहमदाबाद : अहमदाबाद येथे भारत-इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी हरवलं आहे. तर हा सामना जिंकून भारताने मालिका देखील ३-१ ने आपल्या खिशात घातली आहे. याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध इंग्लड मध्ये लॉर्ड्सवर होणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये ही फायनल खेळवली जाईल. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात ही मॅच नियोजित आहे, पण आता या ठिकाणाबाबत साशंकता निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंची सुरक्षा बघता आयसीसी फायनलचं ठिकाण बदलू शकतं.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार लॉर्ड्सवरच्या फायनलबाबत विचार केला जात असल्याचं आयसीसीच्या सूत्रांनी सांगितलं. ‘ठिकाणाची लवकरच घोषणा केली जाईल. आयसीसीचं प्लानिंग लॉर्ड्स नाही. इंग्लंड क्रिकेट बोर्ड आणि त्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडून आयसीसी सल्ला घेईल. इंग्लंडने मागच्या वर्षी जसा बायो-बबल बनवला होता, तसा यावेळीही बनवला जाऊ शकतो,’ असं आयसीसीच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!