Share

विजयाचा गुलाल लावत टीम इंडियाची होळी साजरी…

Published On: 

पुणे : इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय रविवरी भारत विरुद्ध इंग्लंड संघातील वनडे मालिकेतील तिसरा सामना झाला. या सामन्यात भारताने ७ धावांनी विजय मिळवत मालिका २-१ अशा फरकाने जिंकली आहे.

आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 धावांनी विजय मिळवला. शेवटच्या षटकांत इंग्लंडला विजयासाठी 6 चेंडूत 14 धावांची आवश्यकता होती, मात्र नटराजनने अचूक गोलंदाजी करताना केवळ 6 धावा दिल्या आणि भारताने विजय साकार केला. या विजयासह भारताने 3 सामन्यांची मालिका 2-1 ने जिंकली. सॅम करनला सामनावीर, तर जॉनी बेअरस्टोला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

विजयासाठी 330 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडला निर्धारित 50 षटकांमध्ये मध्ये 9 विकेट्स गमावून 322 धावाच करता आल्या. इंग्लंडकडून सॅम करनने 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 95 धावांची झुंजार खेळी केली. मात्र, संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. याव्यतिरिक्त डेव्हिड मलानने 50(50)अर्धशतकी तर लिविंगस्टोनने 36(36) धावांची खेळी केली.

भारतीय संघाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर भुवनेश्वर कुमारने 3 फलंदाजांना माघारी धाडत शार्दुलला चांगली साथ दिली. तसेच टी नटराजनने 1 विकेट मिळवली.

तत्पूर्वी, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाने सलामीवीर शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर तिसऱ्या आणि निर्णायक एकदिवसीय सामन्यात इंग्लंडसमोर विजयासाठी 330 धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाचा डाव 48.2 षटकांत 329 धावसंख्येवरच आटोपला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!