Share

शिक्षकांचे प्रश्न लवकरच मार्गी लावणार- वर्षा गायकवाड

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या शिष्टमंडळाने मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. विनाअनुदानीत संस्थांबाबतच्या अध्यादेशातील `कायम` शब्द वगळल्यानंतर संस्थांचे मुल्यांकन झाले. त्यात संस्थांच्या तुकड्या अनुदानास पात्र ठरल्या. त्यांचे अनुदान तसेच त्या शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न तातडीने सोडवावा, या मागणीबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शिक्षक महासंघाला दिले आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रेंगाळलेला प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रश्न व अडचणींवर चर्चा झाली.

शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० वर्षानंतर देण्यात येणारी आश्वासित प्रगती योजना शिक्षकांसाठी सुरू करावी. शिक्षण संस्थांतील वाढीव पदांना मान्यता देण्याची मागणी जुनी आहे. त्याची फाइल मंत्रिमंडळ बैठकीत त्वरित सादर व्हावी. माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न सोडवावा. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. दिवाळीची सुट्टी जाहीर करावी. बोर्डाच्या परीक्षा व शैक्षणिक सत्र जाहीर करण्यात यावे. या व इतर मागण्यांबाबत महासंघ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा बैठकीत झाली. यावेळी अनुदानासंदर्भात शासनाचा आदेश दिवाळीपूर्वी निर्गमित करावा असा आग्रह पदाधिकारी व आमदार तांबे यांनी धरला.

यासंदर्भातील मागण्यांचे निवेदन महासंघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.संजय शिंदे, समन्वयक मुकुंदराव आंदळकर यांनी मंत्री गायकवाड यांना दिले. वाढीव पदांच्या मान्यतेची फाइल आगामी मंत्रिमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल. दिवाळीपूर्वी महासंघ पदाधिकारी यांच्यासोबत शिक्षक समस्यांबाबत बैठक घेतली जाणार असल्याचे आश्वासन मंत्री गायकवाड यांनी दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!