अहमदनगर: करोनामुळे मार्च महिन्यामध्ये जाहीर झालेला लॉकडाउनला तब्बल ८ महिने पूर्ण होत आहेत. या काळामध्ये सर्वच क्षेत्रांवर मोठ्याप्रमाणात विपरीत परिणाम घडून आले तर अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली आहे. मात्र ही परिस्थिती लक्षात घेत सुरुवातीला बंद असलेली सर्व क्षेत्र जून महिन्यापासून नियमांच्या चौकटीत राहून हळूहळू अनलॉक करण्यात येत आहेत. त्यामुळे आता राज्यातील मंदिरे खुले करावेत ही मागणी घेऊन भाजप राज्यभर आंदोलन करत आहे.
शिर्डीचे साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, यासाठी भाजपकडून अनेक आंदोलने करण्यात आली आहेत. मात्र, राज्य सरकार साई मंदिर खुले करण्यासाठी कुठलाही निर्णय घेत नाही. त्यामुळे आता साई मंदिर खुले करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे नगर दक्षिणचे खासदार सुजय विखे पाटील म्हणाले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 17 मार्चपासून साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. राज्य सरकारकडून आता चित्रपटगृह आणि जलतरण तलावही खुले करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, मंदिर उघडण्याबाबत अद्याप सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, आता दिवाळी काही दिवसांवर आली असताना आता तरी सरकारने दिवाळीला शिर्डीतील साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करावे, अन्यथा दिवाळीनंतर शिर्डी ग्रामस्थांबरोबर शिर्डीत एक बैठक घेऊन ग्रामस्थ यांच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करणार असल्याचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज शिर्डीत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार ; राणेंचा जोरदार प्रहार
- …म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन
- …तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचं काही नेत्यांचं षडयंत्र; ओबीसी समाज आक्रमक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

