Share

…म्हणून सूर्यकुमार यादवला भारतीय संघात स्थान नाही ; अखेर रवी शास्त्रींनी सोडलं मौन

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सुर्यकुमार यादव या तिसऱ्या क्रमांकावर खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूने केलेली कामगिरी पाहता; या खेळाडूला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ‘भारतीय संघात स्थान का मिळाले नसावे’ हा मुद्दा क्रिकेटप्रेमींच्या मनात डोकावलेला आहे.

सोशल माध्यमांमध्ये सुद्धा हा मुद्दा बऱ्याच प्रमाणावर चर्चेचा विषय ठरला आहे. या खेळाडूची अशी चांगली कामगिरी ही केवळ या IPL मधली नसून, गेल्या ३ वर्षात हा खेळाडू मुंबई इंडियन्स कडून खेळताना सातत्यपूर्ण कामगिरी करत आलेला आहे.

यावर आता टीम इंडियाचे कोच रवी शास्त्री यांनी मौन सोडलंय. सूर्यकुमारला टीम इंडियात स्थान का मिळत नाही यावर त्यांनी उत्तर दिलंय. रवी शास्त्री म्हणाले, सध्या टीम इंडियामध्ये अनेक चांगले आणि तरुण खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत 30 वर्षीय खेळाडूला संधी मिळणं फार कठीण आहे. म्हणूनच मी तरुण खेळाडूंना संयम राखण्याचा सल्ला देत आहे.

“इतकंच नव्हे तर सुर्यकुमार यादव प्रमाणे आणखी 3-4 खेळाडू असे आहेत. ज्यांनी चांगली कामगिरी करून त्यांना टीममध्ये स्थान मिळालं नाहीये. टीममध्ये जेव्हा अनुभवी आणि तरुण खेळाडू भरलेले असतात अशावेळी इतर खेळाडूंना संधी देणं कठीण असतं,” असंही ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!