मुंबई : राज्यात सद्या आरक्षणावरून वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा समाज करत आहे.
तर, आरक्षण मिळेपर्यंत एमपीएससी (MPSC) परीक्षांसह राज्य सरकारने जाहीर केलेली मेगा भरती देखील पुढे ढकलण्यासाठी मराठा समाजाने तीव्र भूमिका घेतली होती. यानंतर एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. मात्र, ओबीसी समाजाचे नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंत्री छगन भुजबळांसह विजय वडेट्टीवार यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.
दरम्यान, काही राजकारणी आपापल्या फायद्यासाठी मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप देखील करण्यात आला होता. ओबीसी समाजातर्फे आज मुंबईतील वांद्रयापासून ते अंधेरी तहसील कार्यालयापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली होती. यानंतर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी माध्यमांशी संवाद साधताना गंभीर आरोप केले.
इतिहासातील हे सर्वात मोठं ओबीसींचं राज्यव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर काही नेते, पुढारी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणात घुसवण्याचं षडयंत्र करत आहेत. आणि याविरोधात कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाजाला ओबीसीमध्ये येऊ न दिले पाहिजे ही मुख्य मागणी असून थांबवलेली मेगा भरती त्वरित सुरु केली पाहिजे. तसेच इतर थकवलेले निधी लवकरात लवकर दिले गेले पाहिजेत’ अशी मागणी प्रकाश शेंडगे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- गेल्या दोन महिन्यात सक्रीय रुग्णसंख्येची टक्केवारी तिपटीने घटली ?
- १५ मोठ्या कंपन्यांसोबत केलेल्या कराराने राज्यात औद्योगिक क्षेत्राला भरारी मिळणार – राष्ट्रवादी
- …तर ‘मातोश्री’वर दिवाळी साजरी होऊच देणार नाही ; नवनीत राणांचा आक्रमक इशारा
- भाजपच्या संकटमोचक महाजनांना खडसेंचा मोठा झटका !
- राष्ट्रवादी काँग्रेसने पाडलं वंचित बहुजन आघाडीला खिंडार!


