औरंगाबाद : कन्नड येथे कोरोनाच्या पाश्वभूमीवर शिक्षकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु सदरील कोरोना सर्वेक्षणासाठी सुरक्षा सुविधा न दिल्याने शिक्षकांत असंतोष दिसत आहे. विमा सुरक्षा देण्याची मागणी शिक्षक समितीने केली आहे.
वर्षभरापासून कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने शिक्षकांवर अतिरिक्त कामाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्यामध्ये घरोघरी जाऊन कुटुंब सर्वेक्षण, चौकातील वाहनांची तपासणी, स्वस्त धान्य दुकानांचे पर्यवेक्षण, कोवीड सेंटरवर चौकशी अधिकारी अशा विविध कामासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. या कामासाठी आवश्यक असणारे विमासुरक्षा कवच यावर्षी शिक्षकांसह आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविका,यांना शासनाकडून देण्यात आले नाही. मागील वर्षीचा विमा सुरक्षा कवचाची मुदत मागील सप्टेंबर मध्येच संपली आहे. त्याला मुदतवाढ देऊन नवीन विमा सुरक्षा कवच प्रदान करुन तसा शासनाने लेखी आदेश जारी करावा.
सोबतच सॅनिटायझर, मास्क, थर्मलगन,आँक्सीमिटर,पीपीईकीट तसेच इतर आवश्यक साहित्य सुद्धा पुरविले जात नाही. वर्षभरात सदरील कामावर कर्तव्य बजावताना अनेक शिक्षकांचा जीव गेला आहे. या महिन्यात कर्तव्य बजावतांना 75 % शिक्षक कोरोना बाधीत आढळूनआलेआहेत.त्या संबंधितांच्या कुटुंबीयांना विम्याचा लाभ मिळालेला नाही, शिक्षकांना अनेक अशैक्षणिक कामात राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारी दिली आहे. आणी सुरक्षा सुविधा सुरक्षा कवच तात्काळ पुरविण्यात यावे अशी भूमिका प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर सरचिटणीस रंजित राठोड,नितीन नवले,श्याम राजपूत शालिकराम खिस्ते,गुलाब चव्हाण,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सतीश कोळी,
राजू ठाकुर,पंडित भोसले,बबन थोरे,नामदेव चव्हाण यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री कार्यालयामार्फत उपस्थित करण्यात आलेल्या शंकेची परमबीर सिंग यांनी हवाच काढली
- जोपर्यंत गृहमंत्री राजीनामा देत नाहीत तोपर्यंत भाजप आंदोलन करणार : फडणवीस
- खळबळजनक! ग्रामपंचायत निवडणुकीत मदत केली नाही म्हणून तरुणाचा खून
- काठीने मारहाण करून वृध्दाचा खून करणाऱ्या ‘त्या’ आरोपीस जन्मठेप!
- एमपीएससी; लातूर शहरातील १९ परीक्षा केंद्रावर सात हजार ८९६ विद्यार्थी देणार परीक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

