Share

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीचे आमीष दाखवून शिक्षकाची फसवणूक

Published On: 

औरंगाबाद : शेअर माक्रेटमध्ये गुंतवणूक करण्याचे आमीष दाखवून एका शिक्षकाचे २ लाख रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना वैजापूर शहरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येवला तालुक्यातील आडसुरेगाव येथे जि.प.शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक नामदेव शंकर उलपे हे वैजापूर येथे विद्यानगर भागात राहतात. त्यांनी शेअर बाजार मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एंजेल ब्रोकींग शेअर माक्रेट हे अ;ॅप मोबाईलवर डाऊनलोड केले होते. या अ;ॅपच्या माध्यमातून एक महिन्यापासून ते गुंतवणूक करीत होते. त्यांनी या अ;ॅपमध्ये मोठ्या रक्कमेची गुंतवणूक केली.

मात्र, खात्री करण्यासाठी त्यांनी कस्टम केअरशी संपर्क केला. त्यानंतर त्यांच्या मोबाईलवर कॉल आला. कस्टम केअर मधून बोलत असल्याचे सांगून त्यांनी उलपे यांच्याकडून अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे उलपे यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी जवळच्या एटिएमवर जाऊन खात्यावरील रक्कम तपासली असता, त्यांचे २ लाख रूपये २५ हजार परस्पर काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे उलपे यांनी पोलिस ठाणे गाठून आपली फिर्याद दिली. त्यानुसार नामदेव उलपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात एका जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!