Share

करदात्यांना अखेर दिलासा; रिटर्न भरण्यासाठी मिळाली मुदतवाढ !

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली परिस्थिती लक्षात सरकारकडून बँकांना तीन महिन्यांसाठी नागरिकांच्या कर्जाचे हप्ते वसूल न करण्याचे आदेश दिले होते. त्याचप्रमाणे आयकर विभागाने देखील आयटी रिटर्न भरण्याची मुदत वाढवून दिली होती. आता ही तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने आयटीआर रिटर्न भरण्याची मुदत १० दिवस वाढवली आहे. आता करदात्यांना १० जानेवारी २०२१ पर्यंत आयटीआर रिटर्न भरता येईल.

मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर आयटीआर रिटर्न फायलिंगना मुदतवाढीचा मागणी करणाऱ्या करदात्यांना केंद्र सरकारने आज दिलासा दिला आहे. ज्या लोकांना आपल्या रिटर्नसोबत ऑडिट रिपोर्ट लावावी लागत नाही, त्यांना ३१ डिसेंबर २०२० ही शेवटची तारीख देण्यात आली होती. मात्र, अंतिम तारखेत आता वाढ करण्यात आली असून ;करदात्यांना १० जानेवारी २०२१ पर्यंत आयटीआर रिटर्न भरता येईल.

त्याचबरोबर ज्यांची खाती ऑडिटसाठी ठेवण्यात आली आहेत, त्यांच्यासाठी अंतिम मुदत 15 फेब्रुवारीपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्याशिवाय ट्रस्ट योजनेची तारीखही 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आलीय.

या व्यक्तींना भरावा लागेल आयटीआर रिटर्न

१) बँक खात्यात १ कोटीहून अधिक रक्कम आहे.

२) परदेशी यात्रा केली आहे आणि त्यावर २ लाखांहून अधिक रक्कम खर्च केली आहे.

३) आर्थिक वर्षात एक लाखाहून अधिक वीज बिल भरले आहे.

४) परदेशातून उत्पन्न मिळत असल्यास किंवा परदेशात मालमत्ता असल्यास अशा भारतीय व्यक्तींना आयटीआर रिटर्न भरावा लागेल.

५) कलम ५४, ५४ बी, ५४ डी , ५४ ईसी, ५४ एफ, ५४ जी, ५४ जीए, आणि ५४ जीबी या कलमात कर वजावट घेण्यापूर्वी कर सवलतीपेक्षा उत्पन्न अधिक असल्यास कर विवरण सादर करावे लागेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!