🕒 1 min read
उत्तर प्रदेश : महाराष्ट्रातील मुदत संपणाऱ्या आणि लांबणीवर पडलेल्या 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून 15 जानेवारीला मतदान होत आहे. या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांचा थेट सहभाग नसला तरी या पक्षाशी संबंधित पॅनेल्स या निवडणुकांमध्ये उतरले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी पंचायत निवडणुका होणार आहेत. नुकत्याच झालेल्या बिहार निवडणुकांनंतर शिवसेना युपीमधील स्थानिक निवडणूका देखील लढणार असल्याचं समजत आहे. या निवडणूक विधानसभेआधीच्या सेमी फायनल म्हणून अधिक चर्चेत आहेत. आम आदमी पार्टी (आप) आणि अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) पक्षानंतर आता शिवसेनेने देखील आपले उमेदवार उतरवण्याची तयारी दर्शवली आहे.
यासंदर्भात, शिवसेनेचे उत्तर प्रदेश प्रदेश प्रमुख अनिल सिंह म्हणाले की, ‘पंचायत निवडणुकीसाठी जिल्हावार आढावा घेऊन पक्षाच्या वतीने प्रभारी नियुक्त केला जात आहे. सर्व जिल्ह्यांमधून अर्ज मागविण्यात येत आहेत. याशिवाय शिवसेनेचे शिष्टमंडळ महाराष्ट्रातील संघटनेच्या प्रमुख नेत्यांची भेट घेऊन त्यांना निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती देणार आहे.’
तर, ‘आमचे संघटन संपूर्ण राज्यात चांगलं काम करीत आहे. मागील निवडणुकीत 16 जिल्हा पंचायत सदस्य आणि 150 हून अधिक प्रधान निवडले गेले होते. काँग्रेससोबत युती करुन पंचायत निवडणुका लढवण्यासाठी महाराष्ट्रातील शिवसेना खासदार अरविंद सावंत 16 जानेवारीला राज्यात येणार आहे. त्यांच्यासमवेत बैठक आयोजित केली जाईल. महाराष्ट्रात आमची युती आहे. येथे देखील असू शकते.’ असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहेत. दरम्यान, याला काँग्रेस काही प्रतिसाद देणार का? हे देखील महत्वाचं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पुनावाला यांचे कार्य हे महाराष्ट्राचे व देशाचे नाव उंचावणारे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्यावा’
- मुंबईकरांनो, ‘थर्टी फर्स्ट’च्या सेलिब्रेशनसाठी जेवण हवं असेल तर साडेनऊच्या आधीच ऑर्डर द्या!
- जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!
- राऊतांना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; आशिष शेलारांची जहरी टीका
- केंद्रीय मंत्र्यांनीही घेतला शेतकरी आंदोलनातील लंगरमधील भोजनाचा आस्वाद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
