Share

जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!

Published On: 

कोल्हापूर : २०१९ विधानसभांच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपसोबत असलेला संसार मोडून विसंगत विचारधारा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. यानंतर, हे तीनचाकी सरकार एकमेकांच्या पायात पाय अडकून पडेल असं भाकीत करून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली.

तर नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक आमदार निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळवता आलं. त्यामुळे एकीच्या बळाचा अनुभव आल्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी पुढील येणाऱ्या निवडणुका देखील एकत्रपणे लढवल्या जातील असा खुलासा केला होता. मात्र, आता स्थानिक पातळीवर होणाऱ्या मागणीमुळे महाविकास आघाडीत तणाव वाढण्याची चिन्हे आहेत.

कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र लढणार, अशी चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेला मंत्री सतेज पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पूर्णविराम दिला आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेसाठी महाविकास आघाडी स्थापन करण्यात येईल, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.

दुसरीकडं, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मात्र एकत्र लढण्यासाठी इच्छूक असल्याचं दिसून आलं होतं. खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी एकत्र लढेल असं सांगितलं होतं. मात्र, आता येत्या निवडणुकांमध्ये कोल्हापूर महापालिकेसह ‘आमचं मोडलंय’ असं दिसून येत आहे. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आता स्वबळाची तयारी सुरु केल्याच्या चर्चा आहेत.

“जिथे शक्य असेल तिथे राष्ट्रवादी महाविकास आघाडीतून निवडणूक लढवणार आणि जिथे स्वबळाची ताकद असेल तिथे स्वबळावर निवडणूक लढवू”, असं विधान राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पहिल्यांदाच स्वबळाची भाषा केली आहे.

कोल्हापुरात काँग्रेस-शिवसेनेत रंगला कलगीतुरा !

काँग्रेस नेते व राज्यमंत्री सतेज पाटील आणि शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे. स्वबळाची भाषा सर्वात आधी राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना मेळाव्यात केल्याचा दावा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. क्षीरसागर यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला. सतेज पाटील शिवसेना आणि राष्ट्रवादीला टेकओव्हर करायचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला.

2014 मध्ये सतेज पाटील यांचा पराभव झाला. 2017 मध्ये त्यांची विधानपरिषदेवर नेमणूक झाली. यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य यांनी बंटी पाटलांना मतदान केलं. 2019 च्या विधानसभेला त्यांनी धोका दिला. जेव्हा लागतं, तेव्हा निश्चितपणे शिवसेनेकडून घेतात. बंटी पाटील विधानसभेची पायरी चढण्याची पहिली वेळ होती, तेव्हा शिवसेनेने त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. शिवसेनेचं बोट धरुन ते विधानसभेत पोहोचले. ते आज विसरले आहेत, अशी खंत क्षीरसागर यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!