मुंबई : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस पाठवली आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील राजकारण पुन्हा तापलं आहे. या घटनेनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं दिसून येत आहे. भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीतील ज्या-ज्या नेत्यांना आदींची नोटीस आली आहे त्यांना चौकशीला समोर जाण्याचं आव्हान दिलं आहे.
या प्रकरणात आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी देखील उडी घेतली आहे. ‘इडीचे ऑफिस सध्या मोदींच्या घरातून चालतं. हातातल्या बाहुलीप्रमाणे इडीला नाचवलं जात आहे. स्वतंत्रपूर्व काळातदेखील इतका अतिरेक झाला नाही. त्यामुळे ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ?’ असा जहरी सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.
‘एका तरी भाजपच्या नेत्यावर, आमदारांवर चौकशी झाली असेल असे एखादे उदाहरण सापडलं नाही. हे सर्व गंगास्नान करून आलेत का?’ असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. दरम्यान, भाजपचे नेते व आमदार ऍड. आशिष शेलार यांनी, ‘संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आल्यापासून संजय राऊत ज्याप्रकारे लिहित आहेत किंबहुना वक्तव्यं करत आहे त्यावरुन ते बिथरल्याचं दिसत आहेत. त्यांना तात्काळ मानसोपचार तज्ज्ञाला दाखवण्याची गरज आहे’ अशी विखारी टीका केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- EWS आरक्षणाच्या जीआरमध्ये चुका, मराठा समाजाला फायदा कसा होणार स्पष्ट करा – मेटे
- पुणेकरांनो, ‘थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन’साठीचे महत्वाचे ‘हे’ दहा नियम पाळाच; अन्यथा…
- जिथं ताकद, तिथं स्वबळ; राष्ट्रवादीने पहिल्यांदाच दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा!
- आता उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांसाठी शिवसेना काँग्रेसला देणार मैत्रीची हाक?
- केंद्रीय मंत्र्यांनीही घेतला शेतकरी आंदोलनातील लंगरमधील भोजनाचा आस्वाद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

