Share

‘त्या’शाळांना २० टक्के अनुदान – विनोद तावडे

Published On: 

नागपूर :  गेल्यावर्षी 1 व 2 जुलै, 2016 अन्वये मुल्यांकन करुन अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या सुमारे 158 प्राथमिक शाळा व 504 तुकड्यांवरील 1417 शिक्षक व 631 माध्यमिक शाळा व 1605 तुकड्यांवरील 5373 शिक्षक व 2180 शिक्षकेत्तर अशा एकूण 8970 कर्मचाऱ्यांना 20 टक्के अनुदान देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज केली.

तसेच ऑनलाईन मूल्यांकन झाल्यानंतर अनुदानास पात्र ठरणाऱ्या कनिष्ठ हाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळा, आणि तुकड्यांची यादी माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडे प्राप्त झाली असून हे अधिवेशन संपण्यापूर्वी ही पात्र यादी घोषित करण्यात येईल, असे शिक्षणमंत्री तावडे यांनी आज विधान परिषदेत घोषित केले. 20 टक्के अनुदान प्रकरणी मंत्रीमंडळाने यापूर्वी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील अनुषांगिक कार्यवाही तात्काळ केली जाईल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

दोन्ही निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारच्या तिजोरीवर सुमारे 100 कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे, असेही तावडे यांनी सांगितले. 14 जून 2016 पूर्वी अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळांना अटी व शर्तींच्या अधिन राहून 20 टक्के अनुदान देण्याचा मंत्रीमंडळ निर्णय 30 ऑगस्ट 2016 रोजीच्या बैठकीत घेण्यात आला होता, तोच निर्णय 1 व 2 जुलै, 2016 च्या पात्र शाळांसाठी लागू राहील, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. शिक्षक संघटनांच्या या मागण्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या, आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार ना. गो. गाणार, आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार विक्रम काळे, आमदार दत्तात्रय सावंत, आमदार सुधीर तांबे, आमदार बाळाराम पाटील, आमदार अनिल सोले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष वेणूनाथ कडू, महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित उच्च माध्यमिक कमवि शाळा कृती समितीचे तानाजी नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यानंतर या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्यात आला. त्या अनुषंगाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत अनेक बैठका घेण्यात आल्या. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज चर्चा केली. त्यानुसार या निर्णयांची घोषणा करण्यात आल्याचे तावडे यांनी विधान परिषदेत सांगितले.शिक्षणमंत्र्यांच्या या घोषनेनंतर विरोधी पक्षनेते मुंडे यांनी शिक्षणमंत्र्यांचे आभार मानले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!