टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर पक्षांतर झाले आहे. कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी खुंटलेल्या विकासाचा मुद्दा पुढे करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे खा. सुनील तटकरे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. यावरून भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी गुगली टाकली आहे. भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, अशी गुगली लाड यांनी टाकली आहे.
अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्याला पुराचा फटका बसला होता. या पुरात जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. तर नागरिकांना आपत्तीमुळे हालपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी लाड हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते बोलत होते.
लाड म्हणाले की, जिल्ह्यात एक दोनजणच बडे मासे आहेत. ते संपर्कात आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष आता बुडते जहाज बनले आहे. त्यामुळे हे जहाज बुडायच्या आधी ते वाचण्यासाठी अनेकांनी पक्षाला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर भाजपमध्ये यायला अनेकजण इच्छुक आहेत. एवढेच काय तटकरेच भाजपच्या संपर्कात आहेत. मात्र, तटकरे कोण हे लवकरच कळेल, असे म्हणाले.
दरम्यान खा. सुनील तटकरे हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीला गेले होते. ही भेट खासगी होती. या भेटीवरून माध्यमांमध्ये तटकरे हे भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली. पक्षांतराची चर्चा सुरु होताच तटकरे यांनी या चर्चेचे खंडन केले. चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर झालेली भेट ही वैयक्तिक कामासाठी होती असे ते म्हणाले होते. मात्र प्रसाद लाड यांनी पुन्हा तटकरे हे संपर्कात असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे सुनील तटकरे पुन्हा चर्चेत येण्याची शक्यता आहे.
- साध्वी सारख्यांना इतिहास आणि विज्ञान पुन्हा शिकवण्याची गरज : अनिस
- ‘स्वराज आणि जेटली तर गेले आता पुढचा नंबर मोदींचा’
- ‘आमदार असो किंवा नसो तरीही राज ठाकरे हे खणखणीत नाणं’
- सत्तेत असताना जनतेशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती : मुख्यमंत्री
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

