🕒 1 min read
मुंबई : एक काळ होता तेव्हा टाटा सफारीचं वादळ संपूर्ण भारतभर घोंगावत होत. सफारी म्हणजे एक शान होती मात्र जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा मार्केट मधील स्पर्धेत सफारी मागे पडत गेली. आजही ज्यांच्याकडे सफारी आहे त्यांचा वेगळाच रुबाब असतो. कालांतराने स्कॉर्पिओ, इनोव्हा, फॉर्च्युनर, महिंद्रा एक्सयूव्ही अशा गाड्यांच्या पर्यायांमुळे सफारी मागे पडली.
टाटाने सफारी बनवणं देखील बंद केली. मधल्या काळात सफारी स्टॉर्म बाजारात आली होती. या गाडीला संमिश्र प्रतिसाद मिळाला. आता टाटाने पुन्हा एकदा नव्या पद्धतीने बाजारात आपली छाप पडली आहे. हॅरिअर, नेक्सोन, अल्ट्रोज अशा आधुनिक, स्टायलिश आणि सुरक्षित गाड्या लॉन्च केल्यानंतर ताटाला ग्राहकांनी चांगली पसंती दिली होती.
आता २०२१ मध्ये देखील टाटानेआपले मनसुबे जाहीर केले असून कित्येक पिढ्यांची आवडती सफारी नव्या रूपात आणि अत्याधुनिक सेवांसह लाँन्च करण्यात आली आहे. या गाडीचा बोलबाला सद्या सर्वत्र असून आता बुकिंग देखील सुरु झालं आहे. ग्राहक सध्या अवघे 30 हजार रुपये भरुन ही कार बुक करु शकतात. या गाडीचे विविध व्हेरियंट्समध्ये सादर केली जाणार आहे. आजपासून या कारच्या बुकिंगला सुरुवात करण्यात आली आहे. तर २२ फेब्रुवारीपासून या गाडीची डिलिव्हरी सुरु करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. ता गाडीची किंमत बेस व्हेरियंट साठी १५ लाख ते २२ लाख इतकी आहे. (एक्स शो-रूम किंमत शहरांप्रमाणे बदलू शकते )
गाडीमध्ये पॅनरोमिक सनरूफ देण्यात आला असून XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ असे व्हेरियंट्स आहेत. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. तसेच ईपीबी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक देखील या गाडीमध्ये देण्यात आला आहे.
बॉस मोड
बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.
टिल्ट आणि टेलीस्कोपिक स्टियरिंग व्हील
2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.
रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स
सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
सेफ्टी टच
2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मनसेला टाईमपास म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना मनसे नेत्याचं चोख प्रत्युत्तर !
- राज्याच्या राज्यपालपदी एक विक्षिप्त माणूस बसला आहे – यशोमती ठाकूर
- …तर तिसरा उपमुख्यमंत्री अपक्षांचा करा – बच्चू कडू
- ‘अजित पवार यांची परत नॉटरिचेबल होण्याची वेळ आली’
- आता कुठे महाविकास आघाडीचं सरकार स्थिर होत होतं; काँग्रेसच्या ‘या’ कृत्यावर मुख्यमंत्री देखील नाराज ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
