Share

‘तारक मेहता का…’ फेम मुनमुन दत्ताला कोर्टाकडून मोठा दिलासा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सोनी सबवरील गेली अनेक वर्ष सुरू असलेली लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ने प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. विशेष म्हणजे बबीताजी अर्थात अभिनेत्री मुनमुन दत्ता हिचे पात्र अनेकांना आवडते. परंतु मुनमुन दत्ताने दलित समाजाबद्दल केलेले वक्तव्य तिला चांगलेच महागात पडले आहे. याबाबत तिच्या विरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र आत्ता सुप्रीम कोर्टाकडून मुनमुनला दिलासा मिळाला आहे.

याआधी मुनमुनने सोशल मीडियावर एक व्हि़डीओ शेअर केला होता. शेअर केलेल्या व्हिडीओत ती म्हणाली.. ‘मी लवकरच यूट्यूबर दिसणार आहे. त्यासाठी मला सुंदर दिसायचं आहे. मला ** सारखं दिसायचे नाही’. मुनमुनने जातीवाचक शब्दांचा उल्लेख करत अपमानजनक वक्तव्य केल्यामुळे तिच्यावर संताप व्यक्त केला जाऊ लागला. त्यामुळे तिच्या विरोधात हरियाणामधील हांसीमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आता मुंबईत तिच्याविरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियम (अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट) २०१५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.क्

हरियाणाच्या हंसी येथे मुनमुनवर एफआयआर दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे ती चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. मात्र नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार मुनमुन दत्ताला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टाने मुनमुनविरुद्धची ही केस थांबवली आहे. ही केस बंद झाल्यामुळे मुनमुनला मोठा दिलासा मिळाला आहे.

याबाबत मुनमुनने माफी मागितली होती आणि यात तिने सांगितले की, व्हिडीओतील एका शब्दाचा चुकीचा अर्थ काढला गेला. कुणाचाही अपमान करण्याचा, त्यांना धमकावण्याचा, कुणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. भाषेच्या अडचणीमुळे मी तो शब्द चुकीचा अर्थाने घेतला. पण माझी चूक लक्षात आणून देताच मी तो शब्द मागे घेतला. माझ्या मनात प्रत्येक जातीधर्माबद्दल समाजाबद्दल पूर्ण आदर आहे. नकळत झालेल्या या चुकीसाठी मी सर्वांची माफी मागते. मी कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर माफी मागते, असे तिने सोशल मिडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!