मुंबई : फ्लाईंग सिख म्हणून ओळख असलेले दिग्गज धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. पण मात्र अखेर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची हार झाली.
मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर भारतीय क्रिकेटमध्ये जम्बो म्हणून ओळख असलेला माजी क्रिकेटपटु अनिल कुंबळेने मिल्खा सिंग यांना ट्विट करुन श्रद्धांजली अर्पण केली आहे. आपल्या ट्विटमध्ये कुंबळे म्हणाला की, ‘मिल्खा सिंग यांच्या जाण्याने खुप दु:ख होत आहे. भारतीय क्रिडा क्षेत्रात त्यांनी दिलेला वारसा सदैव सोबत राहील. ते एक खरे दिग्गज आणि आमच्यासाठी एक प्रेरणास्थान होते. या दु:खाच्या क्षणी माझ्या प्रार्थना त्यांच्या कुटुंबीयासोबत आहेत.’ असे ट्विट केले आहे.
Deeply saddened to hear the passing of Milkha SinghJi. His legacy will live on… a true legend and an icon. Condolences to his family and friends. ????????
— Anil Kumble (@anilkumble1074) June 19, 2021
मिल्खा सिंग यांनी तब्बल चार वेळा आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. १९६० साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धेत त्यांनी ४०० मीटर शर्यत ४५.६ सेकंदात पूर्ण केली होती. यापुर्वी १९५६ मध्ये आशियाई स्पर्धेत २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. भारत सरकारने त्यांना २००७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत केले होते. पाच दिवसापुर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर मिल्खा सिंह यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- ‘आम्ही एक महान खेळाडू गमावून बसलो’ ; मोदींनी व्यक्त केल्या भावना
- धैर्य आणि इच्छाशक्तीचे प्रतिक ‘मिल्खा सिंह’; सेहवागने वाहिली श्रद्धांजली
- दु:खद! फ्लाइंग सिख धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन
- औरंगाबादची चिंता वाढली, ग्रामीण भागातील रुग्ण संख्येत पुन्हा वाढ
- सुखद! ‘किसान रेल्वे’द्वारे विभागास मिळाला २८ कोटींचा महसूल


