Share

पडद्यावरील ‘मिल्खा सिंग’ फरहानने वाहिली श्रद्धांजली ; म्हणाला, विश्वास बसत नाहीये…

Published On: 

नवी दिल्ली : फ्लाईंग सिख म्हणून ओळख असलेले दिग्गज धावपटु मिल्खा सिंग यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापुर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले होते. पण मात्र अखेर कोरोनाविरुद्धच्या लढ्यात त्यांची हार झाली.

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर याने श्रद्धांजली अर्पण केली आहे. फरहानने एक भावुक पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. फरहान म्हणाला, ‘मला अजूनही विश्वास बसत कि तुम्ही आता आमच्यामध्ये नसणार’ फरहनने  त्यांचा फोटो शेअर त्यांना श्रद्धांजली वाहीली आहे. फरहानने ‘फ्लाईंग सिख’ धावपटु मिल्खा सिंग यांच्या आयुष्यावर एक चित्रपट केला होता. फरहानच्या या चित्रपटाला खूप प्रतिसाद देखील मिळाला होता. या चित्रपटातील फरहनचे काम पाहून मिल्खा सिंग यांनी खूप प्रशंसा देखील केली होती.

मिल्खा सिंग यांनी तब्बल चार वेळा आशियाई स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले होते. १९६० साली रोम येथे झालेल्या ऑलिम्पिंक स्पर्धेत त्यांनी ४०० मीटर शर्यत ४५.६ सेकंदात पूर्ण केली होती. यापुर्वी १९५६ मध्ये आशियाई स्पर्धेत २०० मीटर आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्यांनी सुवर्ण पदक पटकावले होते. पाच दिवसापुर्वीच त्यांच्या पत्नी निर्मल कौर मिल्खा सिंह यांचे ८५ व्या वर्षी निधन झाले होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!