Share

मराठवाड्यासाठी लढणारा तारा निखळला, ज्येष्ठ विधिज्ञ प्रदीप देशमुख यांचे निधन

Published On: 

औरंगाबाद : मराठवाडा जनता विकास परिषदेचे माजी अध्यक्ष, औरंगाबाद खंडपीठ वकील संघाचे माजी अध्यक्ष अॅड. प्रदीप गाेविंदराव देशमुख (वय ६७) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील बेलकुंड गावचे ते मूळ रहिवासी हाेते, त्यांच्या अंत्यसंस्काराप्रसंगी खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे, ज्येष्ठ विधिज्ञ सतीश तळेकर, खंडपीठ वकील संघाचे सचिव घाटाेळ पाटील, बायस आदींसह अनेक मान्यवर उपस्थित हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, असा परिवार आहे.

पद्मविभूषण गाेविंदभाई श्राॅफ यांनी मराठवाड्याच्या विकासाची तळमळ असल्याचे पाहून अॅड. देशमुख यांच्यावर जनता विकास परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी साेपवली. त्यामाध्यमातून अॅड. देशमुख यांनी जायकवाडीला मिळणाऱ्या ८० ते ८२ टिएमसी पाण्याचा प्रश्न, भाई व विजयेंद्र काबरा यांच्या पाठबळाने मराठवाड्यातील वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वाटेला येणाऱ्या अपुऱ्या जागांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर हाेणाऱ्या अन्यायाची बाजू न्यायालयात मांडली. त्यातून वैद्यकीयच्या १५० तर अभियांत्रिकीच्या ७५० जागा वाढवून मिळाल्या. सिडकाेला कुठल्या सुविधा मिळत नसल्याच्या प्रश्नावर दाखल याचिकेवरून खंडपीठाने अॅड. प्रदीप देशमुख यांच्या नावे आयाेग स्थापन करून अहवाल मागवला व त्याआधारे एक स्यूमाेटाे याचिका दाखल करून घेतली.

त्यातून मिळालेल्या आदेशामुळे सिडकाेतील रस्ते, संत तुकाराम नाट्यगृह, बाॅटनिकल गार्डन, पिण्याचे पाणी आदी विविध प्रश्न मार्गी लागले. अॅड. देशमुख यांनी राजीव गांधी यांच्या विचाराने प्रभावित हाेऊन राजीव गांधी इंटलॅक्च्युअल फाेरमची स्थापना केली. त्यामाध्यमातून राज्यभर संघटन केले हाेते. मराठवाड्यातील बलस्थाने आणि दुर्बलता हा प्रकल्प हाती घेऊन परभणीचे डाॅ. के. के. पाटील यांच्या सहकार्याने माेठा ग्रंथही तयार केला हाेता. त्यांच्या निधनाने मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न पाेटतिडकीने मांडणारा विधिज्ञ हरपल्याची भावना व्यक्त हाेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!