Share

Tanaji Sawant | “गेले अडीच वर्ष उद्धव ठाकरे फक्त…”, तानाजी सावंतांचे एका बाणात दोन निशाणे

Published On: 

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड करून शिंदे गटात गेलेले आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र विशेष बाब म्हणजे यावेळी सावंत यांनी एका बाण मध्ये दोन निशाणा साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर देखील टीका केली आहे.

तानाजी सावंत यांचा टोलाः

गेला अडीच वर्षात उद्धव ठाकरे फक्त नावालाच मुख्यमंत्री होते, खरे मुख्यमंत्री हे राष्ट्रवादीचे होते, असा टोला तानाजी सावंत यांनी लगावला आहे. तसेच या राष्ट्रवादींनी गेल्या अडीच वर्षात महाराष्ट्र लुटून खाल्ला असं देखील ते यावेळी म्हणाले. उस्मानाबाद मधील दसरा मेळाव्याच्या तयारीसाठी आयोजित केलेल्या हिंदू गर्जना मेळाव्यात तानाजी सावंत यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ज्या बापाने तुम्हाला जन्माला घातलं त्या बापाची विचारधारा तुम्ही सोडून दिली, ते आम्हाला म्हणतात तुम्ही माझ्या बापाचे फोटो लावू नका, पण तुम्ही आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो का लावता?, शिवाजी महाराजांचा आणि तुमच्या संबंध काय?, असा सवाल देखील तानाजी सावंत यांनी बीडमध्ये उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

दरम्यान, उस्मानाबाद मध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना, आहे त्या जागेवर शेतात, घरी, रस्त्यावर सरकार आता आरोग्याच्या सुविधा देणार असल्याचं सावंतांनी सांगितलं आहे. यासाठी मंत्रालयामध्ये 104 नंबरचा कॉल सेंटर उभारणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केली आहे. चांद्यापासून बांधापर्यंत ही योजना राबवण्यात येणार असून अगदी सर्वसामान्य माणसालाही या योजनेतून उपचार देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं यावेळी तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!