औरंगाबाद : ब्राह्मण समाजाचा गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष सुरु आहे. असे असतांना अजूनही मागण्या प्रलंबित आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी ब्राम्हण समाजाच्या वतीने शुक्रवारी (दि.२२) विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी बजाव आंदोलन करण्यात आले. यावेळी ताम्हण – पळीच्या आवाजाने संपूर्ण विभागीय आयुक्त कार्यालय दणाणून गेले होते.
वेळोवेळी लोकशाही आणि शांततेच्या मार्गाने विविध प्रकारचे आंदोलने करुन, शासन दरबारी ब्राह्मण समाजाने आपल्या समस्या मांडलेल्या आहेत. मात्र अजूनही मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आता ब्राम्हण समाजातर्फे प्रलंबित मागण्यासाठी ताम्हण – पळी बजाव आंदोलन करण्यत आले.
समाजाचे आर्थिक सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच समाजातील तरुणांना शैक्षणिक, व्यवसायिक तसेच रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करुन महामंडळास १००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी, प्रत्येक जिल्ह्यात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह स्थापन करण्यात यावे, केजी टु पीजी शिक्षण मोफत करण्यात यावे, ब्राह्मण समाजावर बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध तत्सम कायदा करुन कारवाई करण्यात यावी. याशिवाय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे, पुरोहित समाजाला मासिक ५ हजार रुपये मानधन सुरु करण्यात यावे,ब्राह्मण समाजाच्या कुळात गेलेल्या जमीनी परत देण्यात याव्यात आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या
- ‘…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल खूप सन्मान आहे’
- मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन
- नागपुरमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; नाराज शिवसैनिकांचे पक्षप्रमुखांना पत्र
- ‘धार्मिक तणाव निर्माण करणाऱ्या पक्षात काम करू करा’, रोहित पवारांचा सल्ला
- …आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

