Share

नागपुरमध्ये शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; नाराज शिवसैनिकांचे पक्षप्रमुखांना पत्र

Published On: 

नागपूर : आगामी काळात नागपूर महानगरपालिका निवडणुक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने पक्षबांधणीची जय्यत तयारी सुरु केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेने काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला आहे. दुष्यंत चतुर्वेदी काँग्रेसमधून शिवसेनेत आल्यानंतर चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात काँग्रेस कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. नागपुरात आधी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वादाची उफाळून आला होता. मात्र, आता शिवसेनेत देखील अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे.

नागपूर शहरातील तीन माजी जिल्हाप्रमुखांच्या सह्यांचे पत्र शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. सध्याचे नागपूर शहर संपर्कप्रमुख दुष्यंत चतुर्वेदी यांच्यावर निष्ठावंत शिवसैनिकांची नाराज आहेत. त्यामुळे नागपुरात दुसरा संपर्कप्रमुख देण्याची मागणी पत्रातून करण्यात आली आहे. दुष्यंत चतुर्वेदी संपर्कप्रमुख नको, अशी मागणी नागपुर मधील नाराज शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूकीपूर्वी मुंबईतील नेत्यांनी समन्वय करावं, अशी मागणीही पत्रातून करण्यात आली आहे. २६ जानेवारीला नाराज शिवसैनिक उद्धव ठाकरेंची भेट घेऊन आपली व्यथा मांडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान नागपूर शहरात बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन गटांनी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर दुसरीकडे नाराज शिवसैनिकांनी थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहून आपल गाऱ्हाणे मांडले आहे. उद्धव ठाकरें नागपूर दौरा करणार आहेत.त्यांच्या आगामी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूर शिवसेनेत गटबाजी उघड झाल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!