उस्मानाबाद : तरुणांसमोर अनेक आव्हाने आहेत. ती ओळखण्याची कला आत्मसात केली पाहिजे. महाविद्यालयातील शिक्षण संपेपर्यंत आपण शिक्षण घेतलेल्या शाखेच्या नोकऱ्या संपलेल्या असतात. राजकारणात यायचे असेल तर लोकांना केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या व धार्मिक तणाव निर्माण न करणाऱ्या पक्षात काम करा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी तरुणाईला दिला. भाई उध्दवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त उस्मानाबादेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी रोहित पवार म्हणाले, केंद्राने शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले असते तर इतक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची गरज पडली नसती. या आंदोलनात लाखावर तरुण उतरल्याने केंद्राला शेतकऱ्यांची ताकद कळाली. राजकारण, समाजकारण बाहेरून सोपे वाटत असले तरी काळ वेगळा आहे. गट, तट, जात, पंथ असे काहीही नसते.
यावेळी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनीही मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भाई उद्धवराव पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी अनेकदा आक्रमक भूमिका घेतल्या. आज तरुणांमध्ये हा गुण दिसत नाही. वॉट्सअॅप विद्यापीठाच्या विश्वात रमलेल्या तरुणांनी गावात येणारा आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या माध्यमातून बाहेर जाणारा पैसा याचा ताळेबंद विचारात घेऊन शेतीक्षेत्रातला पेच सोडवायला हवा. भाईंनी त्या काळात शेतीक्षेत्रासमोरील पेच सोडविले होते. त्याकाळी खाऊन पिऊन सुखी, अशी शेतीची व्याख्या होती. आता असे चित्र राहिलेले नाही, असे मत जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
महत्वाच्या बातम्या
- विराट कोहलीच्या पाठिंब्यामुळे चांगली कामगिरी करू शकलो : मोहम्मद सिराज
- महाराष्ट्राच्या इतिहासात विनायक मेटेंसारखा महाखोटारडा नेता झाला नसेल : कॉंग्रेस
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- भालचंद्र मुणगेकर यांच्या घरावर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद काढणार निषेध मोर्चा
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

