ऑस्ट्रेलिया : भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजची भारतीय संघात निवड झाली होती. त्यामुळे तो भारतीय संघासोबत ऑस्ट्रेलियात होता. ऑस्ट्रेलियामध्येच असताना त्याला वडिलांच्या निधनाची बातमी कळली होती. त्याच्या वडिलांना दीर्घ काळापासून फुफ्फुसांचा आजार होता. बीसीसीआयने सिराजला भारतात परत येण्याचा पर्याय दिला होता, पण या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियाबरोबरच राहण्याचा निर्णय घेतला होता. बीसीसीआयने मोहम्मद सिराजने घेतलेल्या या निर्णयाचा आदर केला आणि या कठीण काळात सिराजचे सांत्वन केले होते. मोहम्मद शमी दुखापतग्रस्त झाल्यानंतर सिराजला कसोटी पदार्पणाची संधी मिळाली.
त्यावरच माइकल क्लार्क म्हणाला की, तो मोहम्मद सिराजचा खूप सन्मान करतो. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील दौरा सुरू होण्यापूर्वीच मोहम्मद सिराजच्या वडिलांचे निधन झाले होते. सिराजने आपल्या व्यक्तिगत आयुष्यात एवढे मोठे नुकसान झाल्यानंतरही भारतीय संघासोबत रहाण्याचा निर्णय घेतला होता. त्याने मेलबर्न कसोटी सामन्यात पदार्पण करत 5 विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला विजय मिळवून दिला. सिराज प्रमाणे माइकल क्लार्क सुद्धा आपल्या कारकिर्दीत अशा परिस्थितीतून गेले आहेत. जेव्हा त्यांच्या वडिलांना कॅन्सर झाला होता.
माइकल क्लार्क इंडिया टुडे सोबत बोलताना म्हणाला, मी शब्दात व्यक्त करू शकत नाही की, माझ्या मनात त्याच्याबद्दल किती सन्मान आहे. जेव्हा मी क्रिकेट खेळत होतो, तेव्हा माझ्या वडिलांना कॅन्सरने ग्रासले होते. त्यांनंतर ही मी घरी परत जाण्याचा निर्णय घेतला नव्हता. हे खूप कठीण होते, मात्र त्याच्या वडिलांचे निधन झाले. त्याने थांबण्याचा निर्णय घेतला आणि प्रामाणिकपणे आपल्या संघाची मदत करण्याचा निर्णय घेतला. शेवटच्या खेळात तुम्हाला वाटत असेल त्यांनी विकेट घेऊ नये. तुम्हाला वाटत होते की, त्याने कमीत कमी 5 विकेट्स घ्यावे, ज्याच्यासाठी त्यांनी येवढा त्याग केला आहे.
माइकल क्लार्क पुढे म्हणाला, ‘मला वाटत होते ऑस्ट्रेलिया संघाने सामना जिंकावा. परंतु मी एक क्रिकेटपटूला या परिस्थितीतून जातांना खुश नाही होणार. त्याने भारतीय संघासाठी आपला प्रामाणिकपणा दाखवला. तो निश्चितच जगातील सर्व श्रेयाचा हक्कदार आहे.’
महत्वाच्या बातम्या
- प्रक्रिया केंद्र २४ तास चालवून कचरा शून्यावर आणा : आयुक्त
- महाराष्ट्राच्या इतिहासात विनायक मेटेंसारखा महाखोटारडा नेता झाला नसेल : कॉंग्रेस
- शेतकरी आंदोलन : शेतकरी आणि सरकारमध्ये आज अकराव्यांदा होणार चर्चा !
- भालचंद्र मुणगेकर यांच्या घरावर रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद काढणार निषेध मोर्चा
- मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्या – रामदास आठवले


