Share

मराठा आरक्षणासाठी आगळेवेगळे आंदोलन

Published On: 

जालना : मराठा आरक्षणाची मागील अनेक वर्षांपासून मागणी केली जात आहे. मात्र, अजूनही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. याच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातील साष्टी पिंपळगाव येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावात ठिय्या आंदोलन केले.

या आंदोलनाची सुरुवात गावातून बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकी, लेझीम पथक, भजनी मंडळी, महिला, पुरुष व लहान मुलं-मुलींची रॅली काढून करण्यात आली. मराठा आरक्षणाची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी समाज बांधवांकडून मुक मोर्चासह ठोक मोर्चे ही काढण्यात आले. त्यानंतर राज्य शासनाने मराठा आरक्षण जाहीर केले. मात्र, मराठा आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अशात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील साष्टीपिंपळगाव येथे मराठा समाज बाधवांच्या वतीने राज्यव्यापी ठिय्या आंदोलन केले  गेले.

या रॅलीत २५ बैलगाड्या, २४ ट्रॅक्टर, वीस दुचाकी, लेझीम पथकाचा समावेश होता. या रॅलीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता. महिला, मुली, पुरुष, तरुण या रॅली मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यावेळी संपूर्ण गावात एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं आशा विविध घोषणांनी दुमदुमून निघाले होते. या रॅली दरम्यान पोलिस बंदोबस्त ही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!