Share

…आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल; पवारांचा राणेंना टोला

Published On: 

कोल्हापूर : राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपला ठाकरे सरकारनं दणका दिला आहे. राज्यातील बड्या भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत कपात करण्याचा मोठा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे.

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार नारायण राणे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान,एका बाजूला ठाकरे सरकार कठोर निर्णय घेत असताना आता नारायण राणे यांना केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे.महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षा काढल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे. नारायण राणे यांच्या ताफ्यात आता 12 सीआयएस एफचे जवान तैनात असणार आहेत.

दरम्यान, सुरक्षा काढून घेतल्यावर राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर तोफ डागली होती तसेच अतिशय कठोर भाषेत त्यांनी निषेध देखील नोंदविला होता. दरम्यान, या मुद्यावर आता खासदार शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

‘केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे आता तरी राणेंना सुखाने झोप लागेल’. असा टोला पवार यांनी कोल्हापुरात लगावला.राज्य सरकारने सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतलं असतांना, केंद्र सरकारने त्या वादात हस्तक्षेप करून पुन्हा नव्याने सुरक्षा पुरवली असून, ही योग्य पद्धत नाहीये अशी टीका पवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!