मुंबई : महात्मा गांधी यांच्याबद्दल अभिनेत्री कंगना रणौत यांनी केलेल्या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या मुद्द्यावरून कंगनावर जोरदार टीका केली आहे. मलाना क्रीम घेऊन कोणी काही बोलत असेल तरीही बापूंचे विचार संपणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. अशी एक महिला दिवसभर मलाना क्रीम घेऊन बसते व बोलते. तिच्या बोलण्याने महात्मा गांधी यांचे विचार संपणार नाही. जे प्रचारक आहेत, जे अशा लोकांना पुढे करत आहेत त्यांना कळलं पाहिजे की, बापूंचे विचार जगाने स्वीकारले आहेत. त्यामुळे कुणी कितीही प्रयत्न केले तरी यामध्ये यश मिळणार नाही, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
ज्या लोकांनी बापूंची हत्या केली ते पण बापूंना बगल देऊ शकत नाही. बापूंचे विचार देशात, जगात लोकांनी स्वीकारले आहेत. एखादी महिला बापूंच्या विरोधात बोलल्यावर लोकांच्या मनात गैरसमज निर्माण होतील हा कुणाचा समज असेल तर ती चूक आहे, असंही मलिकांन सांगितलं आहे.
दरम्यान, कंगना रणौत हिने महात्मा गांधींजींचा अपमान करण्याचे काम केले केले आहे. अहिंसेचा विचार जगाने स्वीकारला आहे. हिंसेने कुठलेही विषय सुटत नाही. त्यामुळे ठरवलं तर अहिंसेच्या मार्गाने काहीही प्राप्त करु शकतो. मात्र तिने बापूंचा अपमान का केला आणि तिचा बोलविता धनी कोण आहे? हे देशाला माहीत आहे, असंही मलिक म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- सरकार कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या नोटीसा, सेवा समाप्तीच्या धमक्या देतंय- गोपीचंद पडळकर
- ‘आधी क्रांतीकारकांचा अपमान, आता महात्मा गांधीवर टीका, यासाठीच पद्मश्री मिळाला का?’
- ठाकरे सरकारचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न; गोपीचंद पडळकरांचा आरोप
- शरद पवार आणि अनिल परब कान उघडून ऐका…; गुणरत्न सदावर्ते आक्रमक
- ‘कंगना जे बोलली त्याचं समर्थन करणे म्हणजे महामूर्खपणा’; गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्मात्याचा निर्णय


