Share

‘एखाद्या नाचीनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं’

Published On: 

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या महात्मा गांधींबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आहे. कंगनाच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरु आहेत. ‘सुभाष चंद्र बोस आणि भगत सिंह यांना महात्मा गांधींनी पाठिंबा दिला नाही. त्यापुढे ती म्हणाली की, दुसरा गाल पुढे केल्याने स्वातंत्र्य मिळत नाही तर भीक मिळते. खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर मिळाले’, असं कंगना आपल्या पोस्टमध्ये म्हणाली आहे. त्यावर आता मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी कंगना रणौतला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

महात्मा गांधींवर भाष्य करण्याची कंगना रनौतची लायकी तरी आहे का? एखादी नाची महात्मा गांधीजींवर बोलतेय. आज कंगना रणौतबद्दल लोक काय बोलतात हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कंगना रणौतनं महात्मा गांधींवर बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं आहे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

दरम्यान, कंगनाने केलेल्या वक्तव्यामुळे कंगनावर अनेकांनी जोरदार टीका केल्या आहेत. तिच्या वक्तव्यामुळे तिचा सर्व स्तरांतून विरोध केला जात असून तिच्यावरील सोशल मीडियावर रोष व्यक्त केला जात आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांनी कंगनावर केलेल्या टीकेवरुन वडेट्टीवार अडचणीत येण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!