औरंगाबाद : मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या वॉटर ग्रीड प्रकल्पाकडे महाविकास आघाडी सरकार मुद्दाम दुर्लक्ष करत असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे. भाजप योजनेसाठी रस्त्यावर उतरेल, तशीच गरज लागली तर न्यायालयात जाण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी लोणीकर यांनी शहरात पत्रकारांशी संवाद साधला.
मराठवाडा पाटबंधारे महामंडळ, जलसंपदा, पाणीपुरवठाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विभागात योजनेबाबत समन्वय नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आमच्या काळात कोणत्याच विभागाने या योजनेला विरोध केलेला नाही. पूर्ण अभ्यास करुनच या योजनेचा आरखडा तयार करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. इतक्या दिवसानंतरही राज्य सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीड बाबत ठोस असा निर्णय घेतलेला नाही. उलट केंद्र शासनाकडेच ११ हजार ५८२ कोटींची मागणी महावसुली सरकारने करण्याचा निर्णय घेतला. उठसूट सर्वच केंद्रशासनाकडे मागायचे असेल तर हे सरकार भाड्याने चालविण्यासाठी द्यावे, असे ते म्हणाले.
या योजनेला खीळ बसणे ही राष्ट्रवादीचे पाप असल्याचा आरोप करून आ.लोणीकर म्हणाले की, आजवर १० डीपीआर झाले आहेत, परंतु सरकारने योजनेला पुढे नेले नाही. कोरोनामुळे अडचणी असल्या तरी योजनेचे काम करण्याबाबत सकारत्मकता सरकारने दाखविली नाही. त्यामुळे ही योजना सरकारला राबवायचीच नाही, असा आरोपही त्यांनी केला. पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना मराठवाड्यासाठी ही योजना नको असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पावसाने केला ‘गेम’; भारतीय संघ अजूनही करू शकतो ‘प्लेइंग ११’ मध्ये बदल ! घ्या जाणून
- राज्य सरकार केंद्राला भाड्याने चालवायला द्या – माजी मंत्री बबनराव लोणीकर
- गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मोबाईल द्या, एमआयएमची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी
- नीती आयोगाच्या सूचनेनंतर विमानतळ विस्तारीकरणाला गती, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी
- महाराष्ट्राला मोठा दिलासा ; नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
