🕒 1 min read
औरंगाबाद : आगामी काळात औरंगाबाद शहराचा विकासाचा वेग लक्षात घेता औद्योगिक विकासाला साह्यभूत ठरणाऱ्या औरंगाबाद विमानतळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ करण्याचे प्रस्तावित आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी प्रस्तावित असलेल्या चिकलठाणा, मूर्तिजापूर, मुकुंदवाडी या ठिकाणी मोजणी झालेल्या जागांची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केली.
औरंगाबाद विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १८२ हेक्टर जमिन प्रस्तावित असून याचे भूसंपादनाची प्रक्रियेसाठी मोजणी व सर्वेक्षण सुरू आहे. भारतीय विमान प्राधिकरणाच्या औरंगाबाद कार्यकक्षेतील जमिनीवरील अतिक्रमणाबाबतही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आढावा घेतला. गावठाण व शहर हद्दीत असलेल्या जमिनीच्या संपादनाबाबत भूसंपादन अधिकारी तसेच सिटी सर्वेच्या अधिकाऱ्यांना यावेळी निर्देशित केले. त्याचप्रमाणे प्रकाश नगर, मूर्तीजापूर, कामगार कॉलनी, चिकलठाणा, येथील रहिवासी नागरिकांशी संवाद साधत त्यांना घराच्या सुविधेबाबतही जिल्हाधिकारी यांनी आश्वासित केले. विमानतळ विस्तारीकरणात आवश्यक असलेल्या व मोजणी झालेल्या जमिनीवर योग्य ते मार्किंग करुन खांब अथवा खूणा दिसतील अशा रंगात आणि सदरील जमिन विमानतळ प्राधिकरणाची आहे, अशा संदेशाचा फलक दर्शनी भागात लावण्याबाबत विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या भेटीदरम्यान विमानतळ प्राधिकरणाचे साळवे यांनी औरंगाबाद शहरातील विमानतळ तयार झाल्यापासून यामध्ये झालेले बदल व पार्श्वभूमी या विषयी माहिती दिली. तसेच तांत्रिक पथकाने विमानतळाच्या नकाशाप्रमाणे कोणकोणत्या बाबी प्रस्तावित आहे याबाबत जिल्हाधिकारी यांना माहिती दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- पुण्यात शनिवार-रविवार फक्त ‘हे’च राहणार सुरु; महापौरांनी दिली माहिती
- भाजपत अंतर्गत कलह! पक्षातील नेत्याकडूनच तब्बल २१ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- ‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही’; राजेश टोपेंच विधान
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- पुण्यात आज ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
