औरंगाबाद : आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलले गरीब विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. यंदाही परिस्थिती तशीच आहे. अनेक पालक आर्थिक संकटात आहे. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना लॅपटॉप किंवा मोबाईल द्यावे किंवा त्यांना ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था करावी अशी मागणी एआयएमआयएमच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे आधीच नुकसान झाले त्यात ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला आहे. मात्र गरीब विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला. आधीच कोरोनाचे सावट असल्याने पालकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यात महागडे मोबाईल खरेदी पालक करू शकत नाही. तसेच आरटीई प्रवेशप्रक्रिया मागील वर्षी राबविण्यात आली मात्र शाळा उघडल्याच नाही. यंदाही सोडत पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली.
मात्र शाळा सुरू होण्याच्या कुठल्याही सूचना दिल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रयत्न करावे. तसेच गरीब विद्यार्थ्यांना मोबाईल किंवा लॅपटॉप द्यावे. नाहीतर किमान विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल अशी व्यवस्था करावी अशी मागणी एआयएमआयएम विद्यार्थी आघाडीचे जिल्हा अध्यक्ष राज चौथमल, उपाध्यक्ष सुनील बनकर, भीमराव रेंगडे, राजेश लोखंडे, सुभाष रंधवे, प्रवीण साबळे सह आदींच्या वतीने करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यातील ‘या’ शहरात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही मिळणार लस
- ‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही’; राजेश टोपेंच विधान
- ‘मोदी आता वाराणसीलाही व्हेनिस बनवल्याचा दावा करतील!’
- ‘अजितदादा सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतात, हे मी भाजपचा असून मान्य करतो’
- जुलै महिन्यात जनशताब्दी, नंदिग्राम एक्सप्रेस धावण्याची शक्यता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

