🕒 1 min read
मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने दररोज आढळणाऱ्या बाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या जास्त आढळत आहे. देशभरासह राज्यातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचे संकट आता हळूहळू कमी होत आहे. अनलॉक प्रक्रियेला सुरूवात होऊन निर्बंधामध्ये सूट देण्यात आलीये. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन, याबाबत निर्णय घेतले गेले आहेत.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काही दिवसांपासून कमी होत असलेला दिसून येत आहे. कोरोनाचा रोजचा आकडा काही दिवसांपासून दहा हजारांच्या खाली आला आहे. आज 9,798 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 14,347 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता 56,99,983 इतकी झालीय. आज 198 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
Maharashtra reports 9,798 new COVID cases, 14,347 patient discharges, and 198 deaths in the past 24 hours
Active cases: 1,34,747
Total discharges: 56,99,983
Death toll: 1,16,674 pic.twitter.com/LcJdXJnsTA— ANI (@ANI) June 18, 2021
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.73 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 198 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.96 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,90,78,541 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,54,508 (15.3 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,54,461 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,831 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात शनिवार-रविवार फक्त ‘हे’च राहणार सुरु; महापौरांनी दिली माहिती
- भाजपत अंतर्गत कलह! पक्षातील नेत्याकडूनच तब्बल २१ हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
- ‘राष्ट्रवादी कधीही स्वबळाची भाषा करणार नाही’; राजेश टोपेंच विधान
- महत्त्वाचे! राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा तिप्पट प्रश्न विचारले महाराष्ट्रातील खासदारांनी
- पुण्यात आज ७ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू तर ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
