Share

‘हा घ्या पुरावा, हिंदूंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारे हिंदूह्रदयसम्राटांचे वारस’

Published On: 

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamta Banerjee) यांनी काल युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, (Aaditya Thackrey) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांची भेट घेतली. यावेळी बॅनर्जी यांच्याशी राजकीय चर्चा झाल्याचे आदित्य ठाकरे यांनी या चर्चेनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले. यावर भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosle) यांनी शिवसेनेवर जहरी टीका केली आहे.

याबाबत तुषार भोसले ट्विट करत म्हणाले, हा घ्या पुरावा, बदललेल्या शिवसेनेचा! ‘जय श्रीराम’ चा नारा ऐकला की डोक्यात तिडीक उठणाऱ्यांपुढे हिंदुह्रदयसम्राटांच्या वारसांनी घातलेलं सपशेल लोटांगण. हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झूकवणारी झूटी सेना. अशी टीका तुषार भोसले यांनी शिवसेनेवर केली आहे.

या चर्चेनंतर संजय राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले, राजकारण व बंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली. ममताजी आज सिध्दीविनायक मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी उद्धवजींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र -बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणारे नाहीत असे त्या म्हणाल्या.

आदित्य ठाकरे म्हणाले, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री मुंबईमध्ये आल्या आहेत. जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर त्या येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. आमच्यात एक वेगळे नाते आहे. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!