Share

‘२ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई’, चित्रा वाघ यांचे टीकास्त्र

Published On: 

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’ला सरकार स्थापनेची संधी मिळून प्रत्यक्ष शपथविधी झाला, तो दिवस होता २८ नोव्हेंबर २०१९. दरम्यान, रविवारी महाविकास आघाडीला दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानंतर या दोन वर्षपूर्तीच्या निमित्ताने विरोधकांकडून तिखट प्रतिक्रीया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भाजपा नेत्या चित्रा वाघ(Chitra Wagh) यांनीही ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे.

चित्र वाघ आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत की,’२ नंबरी सरकारची २ वर्ष, वसूलीची घाई परबांची मुजोरशाही, मुश्रीफांना टेंडरची मलाई, नवाब मलिक दाऊद का ‘भाई’, निलेश लंकेची गुंडाई, महेबूब शेखची झुंडशाही, संजय राठोडांची लफंगाई, राऊतांची नुसती कोल्हेकुई, मुख्यमंत्र्यांची जनतेप्रती बेपर्वाई, २ नंबरी महाविकास आघाडी सरकारची ही काळी कमाई.’

दरम्यान, यापूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या(Kirit Somaiya) यांनी यासंदर्भात बोलत असतांना या २ वर्षात ठाकरे मंत्रिमंडळातील एकूण १२ मंत्री, नेत्यांवर कारवाई सुरु आहे. महाविकास आघाडी म्हणजे महावसुली सरकार असून हे सरकार आज पर्यंतच्या इतिहासात पहिले सरकार पाहिले आहे की २४ महिन्यात २४ मोठे घोटाळे केले आहेत. अर्धा डझन मंत्री किंवा नेते जेलमध्ये जाणार आहेत. या नेत्यांनी आणि ठाकरे सरकारनं महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले, असा आरोप केला होता.

महत्त्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!