Share

‘महाराष्ट्राची प्रकृती बिघडली, राज्याला पूर्वपदावर आणण्यासाठी ऑपरेशनची गरज’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मानेच्या आजारामुळे मुंबईतील एच.एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टरांनी काही दिवस आराम करण्याचा सल्ला दिल्याची माहिती आहे. दरम्यान यावर काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची मागणी काही जणांनी केली होती. आता भाजप अध्यात्मिक समन्वय आघाडीचे आर्चाय तुषार भोसले यांनी टीका केली आहे.

https://twitter.com/AcharyaBhosale/status/1465591903940845573

तुषार भोसले याबाबत ट्विट करत म्हणाले, मुख्यमंत्र्यांवरील शस्त्रक्रिया यशस्वी झाली ; त्यांना लवकर आराम पडो मात्र दोन वर्षांपासून त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे महाराष्ट्राची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. महाराष्ट्राला पूर्वपदावर आणण्यासाठी सुद्धा एका चांगल्या Operation (शस्त्रक्रिया) ची गरज आहे. अशी टीका तुषार भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

दरम्यान, काही दिवसांपासून काळजीवाहू मुख्यमंत्री नेमण्याची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जाणार की नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला जाणार? याबाबतची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री सुभाष देसाई, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता प्रभार दिला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. सोशल मीडियावरही तसे मेसेज व्हायरल होत आहेत. मात्र यावर अधिकृत माहिती मंत्रालयातून देण्यात आली नाही.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!