Share

ममता बॅनर्जी-शरद पवार यांची आज भेट

Published On: 

मुंबई : तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta banerjee) महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्या आज (१ डिसें.) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्हर ओक या निवासस्थानी भेट घेणार आहेत. ही भेट राजकीय दृष्टीने महत्वाची समजली जात असून तृणमूल महाराष्ट्रातही जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर ममता बनर्जी तृणमुल कॉंग्रेसचा राष्ट्रीय पातळीवर विस्तार करण्याचा विचार करत आहेत. २०२४ पर्यंत तृणमूल पक्षाचा विस्तार संपूर्ण देशात होईल, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. याच कारणामुळे त्या काही दिवसांपासून देशभरातील राज्यांचा दौरा करत आहेत. तसेच अनेक राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला मात देण्याच्या दृष्टीने ही भेट महत्वाची मानली जात आहे.

काही दिवसांपासून काँग्रेस आणि तृणमूल यांच्यात जोरदार वाद निर्माण झाले आहेत. काँग्रेस नेते तृणमूलमध्ये सामील झाल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये खडाजंगी झाली आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपाला मात देण्याच्या दृष्टीने या भेटीचं मोठं महत्व असल्याचं बोललं जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!