Share

‘डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा’, मोदी सरकारचे राज्यांना आदेश

Published On: 

नवी दिल्ली : कोरोना काळात डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णसेवा देत असताना त्यांच्यावर व रुग्णालयांवर हल्ले सुरूच आहेत. वाढत्या हल्ल्यांमुळे रुग्णांना सेवा देताना निर्भयपणाचे वातावरण राहिले नाही. एका दबावाखाली रुग्णसेवा द्यावी लागत आहे. यामुळे डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठी केंद्रीय कायदा पारित करावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या वतीने काल शुक्रवारी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करीत आंदोलन करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आज शनिवारी राज्य सरकारांना महत्त्वाचा आदेश दिला आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करणाऱ्या समाजकंटकावर गुन्हा दाखल करण्याचा तसेच साथरोग कायदा (सुधारित) २०२० अंतर्गत कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी राज्यांना तसेच केंद्र शासित प्रदेशांना हे पत्र पाठवलं आहे.

पत्रात म्हटलंय की, डॉक्टर्स अथवा आरोग्य कर्मचाऱ्यांना धमकी अथवा हल्ला झाल्याने त्यांचे मनोबल कमी करु शकते. तसेच त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करु शकते. याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडू शकतो. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांमध्ये जबाबदार असणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आलेत. तसेच आरोपींवर अशा प्रकरणांमध्ये गतीने कारवाई झाली पाहिजे. आपण परिस्थितीनुसार साथरोग (सुधारित) २०२० कायद्यातील तरतुदींचा देखील वापर करु शकता असेही पत्रात नमुद केलेय.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!