Share

शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सभापती किशोर बलांडे यांची मागणी

Published On: 

औरंगाबाद : दोन हजार रुपये दिले तर लाभार्थी शेतकर्यांच्या शेतात रोहयो योजनेसाठी जीओ टॅगिंग होत आहे. शेतकर्यांची होणारी अडवणूक थांबवून संबंधीत बीडीओ आणि कंत्राटी तांत्रिक अधिकार्यावर कारवाईची मागणी जिल्हा परिषद बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी केली

जिल्हा परिषद अध्यक्षा मिना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पंचायत समिती औरंगाबादच्या सभागृहात स्थायी समितीची बैठक पार पडली. शिवसेनेच्या सभापतींनीच आक्रमकपणे रोहयोतील योजनांच्या अंमलबजावणीतील अडवणूक, भ्रष्ट्राचार चव्हाट्यावर आणल्याने उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, सदस्य शिवाजी पाथ्रीकर, मधुकर वालतुरे, किशोर पवार यांनी त्यांच्या मतदार संघातील अडवणुकीचे प्रकार नावासह मांडले.

फुलंब्री तालुक्यातील कंत्राटी तांत्रिक अधिकारी खंदारे आणि गटविकास अधिकारी विलास गंगावणे यांच्याकडे वारंवार सांगूनही शेतकर्यांचा प्रश्न सुटला नाही. वृक्ष लागवडीसाठी पेंडगांव येथील शेतकर्यांना २६ जुनला कार्यरंभ आदेश मिळाले. अद्याप जीओ टॅगिंग न झाल्या पावसाळा सुरु होऊन महिना सरला तरी फळबाग लागवड करता आली नाही. खड्यांचे जीओ टॅगिंग करण्यासाठी प्रत्येक शेतकर्याला दोन हजार रुपये द्यावे लागतात. न दिलेल्या शेतकर्यांचे टॅगिंग अद्याप झालेले नाही. यासंबंधी जाब विचालल्यावर थेट वरपर्यंत पैसे द्यावे लागत असल्याचे अधिकारी सांगत असतील तर कसे होईल असा उद्वीग्न सवाल बलांडे यांनी उपस्थित केला.

फुलंब्रीच्या त्या संबंधीत अधिकार्यांवर आजच कारवाई होईल. याप्रकरणी सर्व आरोपांची चौकशी करुन कारवाई करु. तसेच सर्व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत रोहयोचा कामनिहाय आढावा घेवून कामाला गती देऊ अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांनी दिली.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!