मुंबई : रेमडेसिवीर औषधांची निर्यात करणाऱ्या ब्रुक फार्मा या कंपनीचे संचालक राजेश डोकानिया यांना पोलिसांनी ताब्यात घेतले व रात्री त्यांना अटक झाल्याचे समजताच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली होती.
यावेळी पोलीस आणि भाजप नेत्यांमध्ये शाब्दिक वादावादी झाल्याचे देखील समजत आहे. दरम्यान, कंपनीच्या संचालकांकडे जवळपास 60 हजार रेमडेसिवीरचा साठा असल्याच्या संशयावरून त्यांना चौकशीसाठी विलेपार्ले पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यांनी चौकशी दरम्यान सर्व लीगल पेपर्स दाखवल्याने त्यांना अटक न करता चौकशी करून सोडून देण्यात आलं आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. ‘पोलीस कारवाईत अडथळा आणणाऱ्या फडणवीस, दरेकर व प्रसाद लाडविरोधात कारवाई करा’ अशी नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. वास्तविक रेमडेसीवीरचा साठा खाजगी व्यक्तीला करता येत नाही तर मग फडणवीस यांनी परवानगी कशी काय मिळवली? केंद्रीय मंत्र्यांने भाजप आणि फडणवीसांना रेमडेसीवीरचा साठा आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का? असा प्रश्न उपस्थित करून महामारीच्या काळात साठेबाजांवर पोलीस कारवाई करत असताना त्यात हस्तक्षेप करण्याच्या गंभीर प्रकाराची चौकशी करून दबाव टाकणा-या देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- २० एप्रिल नंतर महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन-गोयल
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
- लातूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार कोरोना चाचणी
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
- इंग्लंडला जाण्याआधी राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला दिला भावुक निरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

