Share

लातूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार कोरोना चाचणी

Published On: 

लातूर: कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आता राज्य सरकारने सर्वत्र संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यात देखील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कडक निर्बंध लागू करून संचारबंदी लागू करण्यात आली आहे, अरी देखील नागरिक विनकारण रस्त्यावर फिरत आहेत. अशा लोकांची संख्या कमी करण्यासाठी आता मोकाट फिरणाऱ्या लोकांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारपासून ही मोहीम सुरु करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अनेक नागरीक शहरात फिरत आहेत. लोकांमध्ये कोरोनाचे गांभीर्य नसल्याचे चित्र लातूर शहरात अनेक दिवसांपासून बघायला मिळत आहे. वारंवार समज देऊनही विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींवर दंडात्मक कार्यवाही सोबतच कोरोना चाचणी करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अमन मित्तल यांनी घेतला आहे.

शहरातील गांधी चौकातील जलकुंभ परिसरात असणाऱ्या झोनल कार्यालयात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना नेऊन त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यावेळी सहाय्यक आयुक्त मंजुषा गुरमे, पोलीस निरीक्षक संजय हिबारे तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कोरोनापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली रस्त्यावर गर्दी करू नये. शासनाच्या निर्देशांचे पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!