मुंबई : सोमवारी झालेल्या पंजाब किंग्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात राजस्थान संघाचा हुकमी एक्का मनाला जाणारा खेळाडू बेन स्टोक्सला दुखापत झाली. दुखापतीमुळे बेन स्टोक्स संघाबाहेर झाला. सोमवारी राजस्थान रॉयल्सकडून पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना त्याला ख्रिस गेलचा झेल घेताना दुखापत झाली. या दुखापतीमुळेच त्याला उर्वरित हंगामाला मुकावे लागले आहे.
आता त्याच्या बोटावर शस्त्र्ाक्रिया करण्यात येणार आहे. बेन स्टोक्सच्या बोटाचा एक्स रे व सिटी स्कॅन रिपोर्ट गुरुवारी आला. त्याच्या बोटाला जास्त दुखापत झाली आहे हे त्या रिपोर्टमधून समजले. आता सोमवारी इंग्लंडला रवाना होणार आहे.
Bye, Ben. ????
The all-rounder flew back home last night after a scan revealed that he'll have to undergo surgery on his finger. Speedy recovery, champ. ????????#HallaBol | #RoyalsFamily | @benstokes38 pic.twitter.com/o1vRi5iO95
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 17, 2021
राजस्थान रॉयल्सनं स्टोक्सला रविवारी भावुक निरोप दिला. राजस्थाननं स्टोक्सला इंग्लंडला जाण्यापूर्वी त्याचे वडील गेरार्ड स्टोक्स यांच्या नावाची जर्सी दिली. गेरार्ड यांचं मागच्या वर्षी कॅन्सरमुळे निधन झालं. ही जर्सी पाहताच स्टोक्सला वडिलांची आठवण झाली, आणि तो त्या आठवणीनं हळवा झाला.
दरम्यान, त्याला तीन महिने क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. 2 जूनपासून सुरू होणाऱया न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळू शकणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- महाराष्ट्राला आजवर देशात सर्वाधिक ऑक्सिजन पुरवठा झाला आहे; पीयूष गोयल यांची माहिती
- महाराष्ट्राला रेमडेसिवीरचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करीत आहे : मांडवीय
- ‘ऑक्सिजन, रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून ठाकरे सरकारचे ‘निर्लज्ज राजकारण’ सुरु आहे’
- औषधांचा सरकारी स्तरावर काळाबाजार? विदर्भ-नागपूरबाबत हेतुपुरस्कर सवती व्यवहार
- रेल्वेमध्ये मास्क न घालणे आता पडणार महागात,‘इतक्या’ रुपयांपर्यंत केला जाणार दंड वसूल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

