Share

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!

Published On: 

उस्मानाबाद: जिल्ह्यात एकीकडे कोरोनाचा कहर वाढत असताना दुसरीकडे सारीची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दि.१६ दिवसभरात ५८० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे तर एकाच दिवसात तब्बल २३ जणांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय व खाजगी रुग्णालये फुल्ल झाली असून ऑक्सीजन बेड व व्हेंटीलेटर सुविधाही तोकडी ठरत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचाही तुटवडा जाणवत आहे. अपुऱ्या सोयी-सुविधावरच कोरोनाग्रस्तांचे जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहेत.

जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. विशेषत: १ मार्च रोजी जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा १७ हजार २९८ होता. शुकवारपर्यंत तो आकडा आता २८४२४ पर्यंत वाढला आहे. दीड महिन्यात कोरोनाची रुग्णसंख्या तब्बल १११२६ ने वाढली आहे.ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही १५० वरून ५७१४ पर्यंत वाढली आहे. कोरोना लसीचा पुरवठा न झाल्याने बहुतांश ठिकाणचे लसीकरणही ठप्प झाले आहे.

विशेषत: ४५ वर्षापुढील सर्व नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दीष्ठ ठेवून शासनाने शहरांसह ग्रामीण भागातही लसीकरण मोहीम सुरू केली होती. परंतु आवश्यक त्या प्रमाणात लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहीम ठप्प झाली आहे.त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. कोरोना व सारीच्या आजाराने दोन दिवसात मृत पावलेल्या २८ जणावर उस्मानाबाद येथील स्मशानभूमीत नगर पालिकेच्या वतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!