नवी दिल्ली : कोरोना रुग्णांना जास्त ऑक्सिजनची आवश्यकता भासत असल्याने अनेक राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या वतीने रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार देशात ६ हजार १७७ मेट्रिक टन ऑक्सिजन वेग-वेगळ्या राज्यांना पुरवण्यात येणार आहे. यातील १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन महाराष्ट्राला मिळणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी दिली आहे.
राज्यांमधील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने रेल्वेच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याची योजना तयार करण्यात आली आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी तशी मागणी केंद्राकडे केली होती. त्या दृष्ट्रीने रेल्वे मंत्रालयाची तयारी पूर्ण झाली आहे. त्यानुसार रेल्वेच्या माध्यमातून ६ हजार १७७ मेट्रिक टन ऑक्सिजन वितरीत करण्यात येणार आहे. यामध्ये २० एप्रिल नंतर महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. तर दिल्लीला ३५० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवले जाणार आहे. यात उत्तर प्रदेशला ८०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले आहे.
कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा नसल्यामुळे राज्यात अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तातडीने ऑक्सिजन पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. यात आता या रेल्वे सेवेचा फायदा राज्यातील कोरोना रुग्णांना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडी केंद्राकडे बोट दाखवून स्वतःचं अपयश लपवू शकत नाही’ :आठवले
- ‘अरे जनाबसैनिका, मंदबुद्धी…ते जंतू नसतात विषाणू असतात’
- लातूरमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची आता होणार कोरोना चाचणी
- उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनासह सारीचा कहर; रुग्णालये खचाखच!
- इंग्लंडला जाण्याआधी राजस्थान रॉयल्सनं बेन स्टोक्सला दिला भावुक निरोप !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

