मुंबई : २०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शिवसेनेनं साथ सोडल्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा येऊन देखील विरोधी पक्षात बसावं लागलं आहे. तर, उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाची धुरा स्वीकारत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. दरम्यान, महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर, कोरोना, वादळ, अतिवृष्टी, भ्रष्टाचार अशा विविध आरोपांवरून माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची कोंडी केल्याचे दिसून आले आहे.
कोरोना काळात देखील मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती हाताळण्यास महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टीका फडणवीसांनी केली आहे. दरम्यान, फडणवीसांवर टीका करताना शिवसेना आमदाराचा तोल घसरल्याचे समोर आले आहे.
‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोंबून टाकले असते,’ असं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. यासोबतच, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रवीण दरेकर यांचा देखील एकेरी उल्लेख करत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. ‘कोरोना काळात नागरिकांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला असून भाजप नेते सरकार पाडायला निघालेआहेत. मात्र अगोदर माणसे जिवंत ठेवा, मगच राजकारण करा. ऑक्सिजन, रेमडेसिविरचा तुटवडा निर्माण झाला आहे, तो केंद्राने सुरळीत करावा’ असं देखील गायकवाड म्हणाले आहेत.
यथा सूडबुद्धी जनाबसेना पक्षप्रमुख
तथा टुकार जनाबसैनिक…अरे मंदबुद्धी, ते जंतू नसतात विषाणू असतात. https://t.co/Hp35mmaWoC
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) April 18, 2021
गायकवाड यांच्या या विधानांचा भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. ‘यथा सूडबुद्धी जनाबसेना पक्षप्रमुख तथा टुकार जनाबसैनिक… अरे मंदबुद्धी, ते जंतू नसतात विषाणू असतात.’ असा मिश्किल टोला भातखळकर यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते’
- स्थानिक प्रशासनानं नागरिकांबद्दल संवेदनशील राहणं आवश्यक – मोदी
- मे मध्ये देखील कडक निर्बंध लागू राहणार ? राजेश टोपेंच सूचक विधान
- संपूर्ण देशच लॉकडाऊनच्या उंभरठ्यावर ? उच्चस्तरीय बैठकीत एकमत !
- ब्रुक फार्माच्या मालकाच्या चौकशीवेळी भाजप नेते वकिलीसाठी का गेले ? मलिकांचा घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

