मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटमचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे.
त्यामुळे मनसेने राज्यातील विविध शहरात आंदोलनाची हाक दिली होती. आज हे आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक, पनवेल आदी शहरांत मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. मात्र, या सर्वच शहरात मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे कर्त्याकर्ते आणि पोलिसांत संघर्ष सुरु असल्याचं दिसून येत आहे.
वाढीव वीजबिल प्रकरणी काहीही झाले तरी आंदोलन होणार असल्याचं वक्तव्य मनसे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.किती वेळा आम्हाला दाबणार, भाजप मोर्चा काढते त्याला परवानगी मिळते. मनसे मोर्चा काढतो त्या परवानगी नाही, हा कुठला न्याय आहे, असा सवाल अविनाश जाधव यांनी केला आहे. ठाकरे सरकार मनसेला घाबरते, हे नपुंसक सरकार आहे. हे सरकार उखडून फेकायचं आहे. काँग्रेसला श्रेय मिळू नये यासाठी शिवसेनेचा डाव आहे. महाराष्ट्रात आंदोलने होणारचं, मला तडीपार करायचं करा, असं आव्हान मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिले आहे.
महत्वाच्या बातम्या
- केसेस दाखल झाल्या तरी चालतील, सरकारला झटका देणारच; मनसे आक्रमक
- धान खरेदीसाठी अधिकाधिक खरेदी केंद्रं सुरू करण्याचे छगन भुजबळ यांचे आदेश
- ‘राजनीति’ फेम अभिनेता अर्जुन रामपालचा आज जन्मदिवस
- वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू : वडेट्टीवार
- काँग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन दिवसांची सीबीआय कोठडी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

