Share

धान खरेदीसाठी अधिकाधिक खरेदी केंद्रं सुरू करण्याचे छगन भुजबळ यांचे आदेश

Published On: 

मुंबई : गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील धान खरेदीबाबत चर्चा करण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे बैठक पार पडली.धान उत्पादक शेतकऱ्यांना धान विक्रीत अडचण येऊ नये तसेच शेतकऱ्यांची धान खरेदी थांबता कामा नये यासाठी जास्तीत जास्त खरेदी केंद्रं सुरू करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत. धान उत्पादन आणि धान विक्रीच्या प्रमाणात खरेदी केंद्रं वाढवा, त्यासाठी जास्तीत जास्त नवीन खरेदी केंद्रं सुरू झाली पाहिजेत आणि शेतकऱ्यांचे सर्व धान खरेदी केले पाहिजे असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.

धान खरेदी करण्याच्या कामात मदत व्हावी यासाठी एपीएमसीची मदत घेऊन धान खरेदीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना खा. प्रफुल पटेल यांनी बैठकीत केली. त्यानुसार ज्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून धान खरेदीसाठी मागणी करण्यात येईल त्यांना धान खरेदीची परवानगी देण्यात यावी तसेच धान खरेदीच्या कामामध्ये एपीएमसी ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहील आणि धान खरेदी करणाऱ्या दोन्ही संस्थांना मदत करेल अशी सूचना भुजबळ यांनी केली.

शेतकऱ्यांचे संपूर्ण धान कोणत्याही परिस्थितीत खरेदी झाले पाहिजे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी धानाचे उत्पादन जास्त आहे त्यामुळे नवीन खरेदी केंद्रं फक्त भंडारा आणि गोंदिया नाही तर चंद्रपूर, गडचिरोली, नागपूरसह संपूर्ण राज्यात ज्या ज्या ठिकाणी गरज आहे अश्या प्रत्येक ठिकाणी सुरू करा, असे आदेश देखील भुजबळ यांनी प्रशासनाला दिले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!