मुंबई : टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असताना सरकारने पाठवलेल्या भरमसाठ वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे.राजकीय पटलावर देखील सध्या वाढीव वीजबिलांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाढीव वीजबिल माफीसाठी आक्रमक झाली असून राज्य सरकारला दिलेला अल्टिमेटमचा कालावधी देखील पूर्ण झाला आहे.
त्यामुळे मनसेने राज्यातील विविध शहरात आंदोलनाची हाक दिली होती. आज हे आंदोलन करण्यात येत असून ठिकठिकाणी पोलीस आणि कार्यकर्त्यांच्यात संघर्ष निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईमध्ये विविध भागात शेकडो कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, नाशिक, पनवेलसह सर्वच शहरात मनसेच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे.
परवानगी नाकारली असली तरी मनसे आपल्या आंदोलनावर ठाम असल्याचं दिसून येत आहे. केसेस दाखल झाल्या तरी चालतील सरकारला झटका देणारच असा इशारा मनसैनिक देत आहेत. आजचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार असून राज्य सरकार दाखल घेऊन काही पाऊल उचलणार का? याकडं नागरिकांचं लक्ष्य लागलं आहे.
ठाकरे सरकार विरोधात घोषणा देण्यात येत असून पोलिसांनी बळाचा वापर केला तरी हे आंदोलन दाबलं जाणार नाही असं मनसे पदाधिकारी सांगत असतानाच अव्वाच्या-सव्वा आकारलेलं वीजबिल जनतेने भरू नये असं आवाहन देखील करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- हात धुतो आहे, जास्त अंगावर याल तर हात धुवून मागे लागेन; उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
- प्रताप सरनाईक यांच्या निकटवर्तीयाला ED कडून अटक, मुलाची आज पुन्हा चौकशी
- २६/११ : वीर शहिदांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन
- ‘सामान्यांचे हाल करणारा लॉकडाऊन पुन्हा नको’, लॉकडाऊनला अजित पवारांचा विरोध
- ‘लवकर लस येऊन कोरोना मुक्ती मिळू दे’, अजित पवारांचं विठुरायाला साकडं


