Share

राज ठाकरेंना झटका ; मनसेचे शॅडो कॅबिनेट मंत्री आदित्य शिरोडकरांनी केला शिवसेनेत प्रवेश

Published On: 

मुंबई : मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष व मनसे सरचिटणीस आदित्य शिरोडकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे आता शिवसेनेने मनसेला मुंबईत जोरदार धक्का दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

आदित्य यांचे वडिल राजन शिरोडकर हे राज ठाकरे यांचे जवळचे मित्र होते. तसेच त्यांचे व्यावसायिक संबंधही होते. मित्राचा मुलगा या नात्याने आदित्य देखील राज यांच्या निकट होते. मात्र मनसे विद्यार्थी सेनेच्या कामावरून मनसेत त्यांच्याबद्दल नाराजी होती. परिणामी आदित्य हे देखील फारसे सक्रिय नव्हते. ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यांनी अखेर मनसेला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला.

आदित्य शिरोडकर जी यांचे शिवसेना परिवारात स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, असे म्हणत आदित्य यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी शिरोडकर यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या निमित्ताने हा मनसेसाठी धक्का मानला जात आहे. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये शिरोडकर यांच्याकडे उच्चशिक्षण विभागाची जबाबदारी होती.

दरम्यान मागील वर्षी २३ जानेवारीला मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण आणि पक्षाचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं होतं. त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मनसेने मुंबईतील राजगड कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत पक्षाचे नेते, महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असल्याचं वक्तव्य केलं होतं.

बाळा नांदगावकरांच्या या विधानावरुनच आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!